जळगाव मार्केटींग फेडरेशन संचालक रोहितदादा निकम ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित !
वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारती पवार यांची प्रमुख उपस्थिती
जळगाव : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन तथा दुध संघाचे संचालक रोहीतदादा निकम यांना गुरुवारी नाशिक येथील एका सोहळ्यात खान्देश भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील कलावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्याची दखल घेत पुरस्कार
शैक्षणिक, संगणक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत आज नवभारत टाइम्स आणि नवराष्ट्र दैनिक यांनी दखल घेत रोहितदादा निकम यांना ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. रोहितदादा निकम यांच्या सॉफ्टएड कंपनीच्या माध्यमातून त्यांनी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक शासकीय संस्था, वित्त संस्था आणि सहकारी संस्थाना सॉफ्टवेअर उत्कृष्ट अशी सेवा पुरवली आहे. यामुळेच महाराष्ट्रातील प्रमुख तीन सॉफ्टवेअर कंपनींमध्ये सॉफ्टएड कंपनीची गणना केली जाते.


सहकारही उत्कृष्ट कामगिरी
सॉफ्टएडच्या माध्यमांतून जिल्ह्यासह राज्यातील हजारो विद्यार्थ्यांच्या संगणकीय गुणवत्तेत भर टाकली. यामुळे आज अनेक विद्यार्थी मोठ्या शहरांमध्ये उच्च पदावर काम करत आहेत. जिल्ह्यातील अनेक गरजू विध्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणासाठी भरघोस अशी आर्थिक मदत देखील केली आहे. सहकार क्षेत्रातही रोहितदादा निकम यांची कामगिरी उल्लेखनीय अशीच राहिली आहे. यामुळेच त्यांनी जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत मंत्री, आमदार यांच्या बरोबरीने विक्रमी मत्ताधिक्क्याने विजय मिळवला होता.
तोट्यातील दूध संघ आला नफ्यात
रोहितदादा निकम यांनी सहकार्यांच्या मदतीने तोट्यात असलेल्या दुध संघाला आजच्या घडीला अधिकचे उत्त्पन्न मिळवून देण्यात यशस्वी ठरले आहेत. आयोध्या राम मंदिरासाठी जळगाव जिल्ह्यातून नेमलेल्या समितीचे रोहितदादा निकम हे उपाध्यक्ष होते. शैक्षणिक, संगणक, सहकार आणि सामाजिक कार्यात केलेल्या कार्याची दाखल घेत रोहितदादा निकम ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज, केंद्रीय मंत्री भारती पवार, सिने अभिनेता चिकटगावकर, अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण, खासदार हेमंत गोडसे, नवभारत आणि नवराष्ट्र ग्रुपचे स्टेट हेड अचल श्रीनिवासन राव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे ‘खान्देश भूषण’ पुरस्काराने सन्मानित होणारे रोहितदादा निकम हे एकमेव व्यक्तिमत्व होते.





