रावेरमार्गे अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्गासाठी रावेरात रास्तारोको

रावेरातून महामार्ग जाण्यासाठी आंदोलकांची मागणी : आंदोलनामुळे वाहतूक ठप्प्


Road stop at Ravera for Ankleshwar-Berhanpur four-lane highway via Ravera रावेर : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्ग रावेरमार्गेच करावा या मागणीसाठी महामार्ग बचाव समितीतर्फे आणि नागरीकांनी शुक्रवार, 29 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता रास्तारोको आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मूळ महामार्ग बदलवून मुक्ताईनगर तालुक्यात वळविल्याने उपस्थित नागरीकांनी रोष व्यक्त करत रास्ता रोकोमध्ये जोरदार निर्दशनही केले.

विश्रामगृहानजीक रास्ता रोको आंदोलन
रावेर शहरातील शासकीय विश्रामगृहानजीक शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर महामार्ग बचाव समिती मार्फत रास्तारोको आंदोलन करण्यात आले. अंकलेश्वर-बर्‍हाणपूर चौपदरी महामार्ग रावेरमार्गेच झाला पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्याने परिसर दणाणून गेला. सुमारे एक तास महामार्ग रोखून धरण्यात आला. रावेर तालुक्यातून मूळ मार्गाने जाणारा महामार्ग वळवून मुक्ताईनगर तालुक्यात नेण्यात आल्याने रोष व्यक्त करण्यात आला. महामार्गावर पडलेले खड्डे निकृष्ट पध्दतीने बुजवण्यात आले असून एका महिन्यात पुन्हा खड्डे पडल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले. अखेर नहींचे अधिकारी गायकवाड आंदोलनस्थळी आले व त्यांनी महामार्ग मूळ मार्गानेच जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. नंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार बी.ए.कापसे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे उपस्थित होते.


यांचा रास्ता रोको आंदोलनात सहभाग
यावेळी उद्योजक श्रीराम पाटील, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, बाजार समिती सभापती सचिन पाटील, उपसभापती योगेश पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, प्रहार जनशक्तीचे सुरेश पाटील, बाजार समिती संचालक जयेश कुयूटे, गणेश महाजन, योगीराज पाटील, पांडुरंग पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, रोहित अग्रवाल, पीपल्स संचालक सोपान साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, माजी नगरसेवक अब्दुल मुत्तलीब, घनश्याम पाटील, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, महेमूद शेख, प्रणीत महाजन, स्वप्निल पाटील, योगेश पाटील, गयासोद्दीन काझी, दीपक पाटील, विनोद चौधरी, गणेश चौधरी, विशाल अग्रवाल, महेश गनवानी, डॉ.सुरेश पाटील, सैय्यद अजगर, पंकज वाघ, डी.डी.वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.

आंदोलनामुळे शेकडो वाहनांच्या रांगा
बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर शासकीय विश्रामगृहानजीक केलेल्या आंदोलनामुळे दोन्ही बाजूला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बस, ट्रक, मोटरसाईकली मोठ्या प्रमाणात रोखून धरण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाश्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थी नंतर आंदोलकांनी महामार्ग मोकळा केला.

यांनी ठेवला बंदोबस्त
सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ, गणेश धुमाळ, दीपाली पाटील, तुषार पाटील, पुरुषोत्तम पाटील, सचिन घुगे, विशाल पाटील आणि सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !