भुसावळात परप्रांतीय युवकाचा चोर समजून खून : दोघांना अटक

संशयितांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी : अनोळखींचा शोध सुरू


Murder of migrant youth in Bhusawal: Two arrested भुसावळ : तरुण कारचा दरवाजा उघडत असल्याने तो चोरी करीत असल्याचा संशय आल्याने जमावाने केलेल्या मारहाणीत युपीतील 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 22 ते 23 डिसेंबरदरम्यान जामनेर रोडवरील बी.जी.जीमच्या बाजूला घडली. धर्मेंद्र महिपत लोधी (29, राजपूत, रा.बदोरा जि.झासी, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

मारहाणीत झाला मृत्यू
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मेंद्र लोधी हा तरुण जामनेर रोडवरील बी.जे.जीमच्या बाजूला असलेल्या मनोज बुटासिंग चितोडीया यांच्या कारचा दरवाजता उघडत असता तो कार चोरी करीत असल्याचा संशय आल्याने त्यास बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे त्याचा दुसर्‍या दिवशी मृत्यू झाला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्यानंतर तपासादरम्यान खून झाल्याचे निष्पन्न झाल्याने भुसावळ तालुक्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जमेरीसिंग चितोडीया, पप्पूसिंग चितोडीया आणि अनोळखी दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.




ही घटना 22 डिसेंबरच्या रात्री 12 ते 23 डिसेंबरच्या रात्री 12.30 वाजेच्या दरम्यान घडली. मृत धमेंद्र हा जेसीबी चालक आहे. तो छत्रपती संभाजीनगरातून भुसावळात आला होता. तो शहरात एका हॉटेलात थांबला होता. तेथून निघून तो जामनेर रोडवर आल्याने त्याच्या सोबत ही दुर्दैवी घटना घडली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !