सोशल नेटवर्कवर कमेंट : दहिगावच्या तरुणाला ठार मारण्याची धमकी


यावल : यावल तालुक्यातील दहिगावच्या 24 वर्षीय तरुणाला सोशल नेटवर्कच्या एका पोस्टवर कमेंट केल्याच्या रागातून पाडळसा व बामनोद येथील काही जणांनी दहिगाव गावात जाऊन त्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
दहिगाव, ता.यावल येथील रोहन दिनेश महाजन (24) या तरुणाने सोशल नेटवर्कच्या मुक्ताईनगर मतदार संघातील एका पोस्टवर कमेंट केली होती. याचे वाईट वाटून दहिगाव येथे जावून प्रवीण तायडे, भरत चौधरी (पाडळसा) व गुणवंत निळ (बामणोद) यांच्यासह 22 जणांनी या 24 वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून यापुढे जर तू मुक्ताईनगर मतदारसंघातील पोस्टवर काही कमेंट केली तर तुला जिथे दिसशील तिथे उडवून टाकू असे सांगत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी 24 वर्षीय तरुणाच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये पुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !