भुसावळ भाजपा अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यपदी राहुल तायडे


Bhusawal BJP Scheduled Caste Morcha City Mayor Rahul Taide भुसावळ : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चा शहराध्यक्षपदी राहुल वसंत तायडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय सावकारे व भाजपा शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वीही तायडे यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती व त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची पुनश्च याच पदावर वर्णी लावण्यात आली. पदाला निश्चितपणे न्याय देणार असून भाजपा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही तायडे यांनी यावेळी दिली.

यावेळी आमदार संजय सावकारे, भाजपा सरचिटणीस सतीश सपकाळे, शहराध्यक्ष युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !