भाजपा जळगाव जिल्हा पूर्व राबवणार नमो चषक स्पर्धा

जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे : युवकांच्या कला कौशल्य तसेच क्रीडा कौशल्याला मिळेल प्रोत्साहन


BJP Jalgaon District East will conduct Namo Cup competition भुसावळ :  युवकांच्या क्रीडा कौशल्य तसेच कला कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य अशा नमो चषकाचे आयोजन भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आगामी 12 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये क्रीडा प्रकारामध्ये क्रिकेट, कुस्ती, कबड्डी, खो-खो, कॅरम, बुद्धिबळ रस्सीखेच, धावणे हे विविध प्रकार असून सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वकृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा गायन, वादन ,एक पात्री प्रयोग असे विविध स्पर्धा नमो चषकाच्या माध्यमातून होतील.

अधिका-अधिक नोंदणीचे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील सर्व युवक-युवती यांच्यासाठी नमो चषक स्पर्धा खुल्या असल्याने जास्तीत-जास्त नोंदणी करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, बेटी बचावो बेटी पढाओचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, प्रदेश उपाध्यक्षा स्मिता वाघ, प्रदेश सचिव अजय भोळे, लोकसभा निवडणूक प्रमुख नंदू महाजन, विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, चंद्रकांत बाविस्कर, गोविंद सैंदाणे, संजय पाटील यांनी केले आहे.


नोंदणीसाठी असे आहे संयोजक
नोंदणीसाठी प्रत्येक विधानसभा व मंडळ स्तरावर संयोजकांची नियुक्ती करण्यात आला आहे. त्यात मुक्ताईनगर- (संयोजक विशाल झाल्टे), जामनेर- संयोजक सुभाष पवार, सुहास पाटील, अमर पाटील, भुसावळ- गोपीसिंग राजपूत, आनंदा प्रताप ठाकरे, रावेर- लखन महाजन व चेतन पाटील, चोपडा- रावसाहेब पाटील, बोदवड- राम आहुजा व अमोल शिरपूरकर, यावल- सागर कोळी. जिल्ह्यातील सर्व जनतेसाठी ही स्पर्धा खुली असून नमो चषकामध्ये जास्तीत -जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा याकरिता जळगाव जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश चव्हाण तसेच सर्व पदाधिकारी नमो चषक स्पर्धा या संदर्भात नियोजन करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !