दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिर
मुक्ताईनगर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर यांच्यामार्फत मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालयात मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. खासदार रक्षा खडसे यांनी उपस्थित राहून दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप केले.
यांची शिबिराला उपस्थिती
मागील काही महिन्यांपूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आज संबंधित कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यात आले. मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, जिल्हा उपाध्यक्ष डी.एस.चव्हाण, जिल्हा सरचिटणीस वैशाली कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा नजमा तडवी, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष प्रफुल जवरे, विनायक पाटील, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन, प.सं.चे माजी सदस्य राजेंद्र सवळे, ललित महाजन, सचिन पाटील, गुणवंत पिवटे, अंकुश चौधरी, विक्रम वरकड, भाजयुमो तालुकाध्यक्ष विशाल झालटे, संतोष झनके, निखील भोलाणकर, रवी राजपूत, विक्रम पाटील, राजेंद्र डापसे, मयूर महाजन, उमेश पाटील, पवन पाटील, सार्थक पाटील, सोमनाथ पाटील व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







