राम मंदिर ट्रस्टच्या नावावर क्यूआर कोडच्या माध्यमातून अनेकांना गंडा : विहिंपची तक्रार
Many people were cheated through QR code in the name of Ram Mandir Trust : VHP complains नवी दिल्ली : राम मंदिर ट्रस्टच्या नावावर क्यूआर कोडच्या माध्यमातून अनेकांची फसवणूक झाल्याची तक्रार विश्व हिंदू परिषदेने उत्तर प्रदेश पोलिसांत केल्याने खळबळ उडाली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने युपी पोलिसांनी तपासाला सुरूवात केली आहे. हिंदू बांधवांची अस्मिता असलेल्या राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होत आहे. या अनुषंगाने देशभरातील नागरीकांमध्ये जल्लोषाचे वातावरण असताना आता फसवणूक होत असल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
मान्यता नसताना पैशांची वसुली
विश्व हिंदू परिषदेने सांगितले की, काही लोक अयोध्या राम मंदिर ट्रस्टच्या नावावर कोणतीही मान्यता न घेता पैसे मागत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय गृहमंत्रालयाकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. लोकांना क्यूआर कोड पाठवून फसवणूक केली जात असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.









