मणिपूरमधील महिला विटंबना, कुस्तीपटूंचे आंदोलनाबाबत सरकारचे मौन रामराज्याच्या कुठल्या संकल्पनेत ? ठाकरे गटाचा सवाल
The silence of the government regarding women’s abuse, wrestlers’ agitation in Manipur in which concept of Ram Rajya ? Question of Thackeray group मुंबई : मावळत्या वर्षाच्या अखेरच्या महिन्यात राममंदिराच्या उद्घाटनावरून मोठी राजकीय वातावरण निर्मिती करण्यात आल. पण मणिपूरमध्ये भररस्त्यावर झालेली महिलांची विटंबना राज्यकर्ते उघड्या डोळ्यांनी पाहात राहिले. ऑलिम्पिक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाविरुद्ध आंदोलन पुकारले. या दोन्ही घटनांवर राज्यकर्त्यांनी ‘ब्र’ उच्चारला नाही. सरकारचे हे मौन रामराज्याच्या कुठल्या संकल्पनेत बसते?”, असा थेट सवाल ठाकरे गटाने मोदी सरकारला आपल्या मुखपत्रातून विचारला आहे.
नवीन तुतारी फुंकावीच लागेल
विद्यमान राज्यकर्त्यांनी सरत्या वर्षांत जनतेसमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न उभे करून ठेवले आहेत. त्याचा जाब उगवत्या वर्षात विचारावाच लागेल. मावळत्या वर्षातील जुनी जळमटे फेकून महाराष्ट्रात आणि देशात नवीन घडविण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास घेऊनच नवीन वर्षात सर्वांना वाटचाल करावी लागेल. केशवसुतांनी सांगितल्याप्रमाणे नवीन तुतारी देशाला फुंकावीच लागेल, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.









