यावल तालुकाध्यक्षांसह शहराध्यक्ष लवकरच नियुक्ती : उमेश नेमाडे
यावल : शहरातील श्री महर्षी व्यास मंदिराच्या सभागृहात राष्ट्रवादी अजीत पवार गटाची बैठक घेण्यात आली. यात जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांचा आढावा घेतला. लवकरच तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष नियुक्त करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी नगरपालिका निवडणुकीत देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सुचना देण्यात आल्या.
यांची बैठकीला उपस्थिती
शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे हे होते.बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अॅड.देवकांत पाटील यांनी केले त्यांनी प्रास्तविकेतून अजित पवार यांच्या विचारांनी प्रेरीत होत कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. येणार्या निवडणुकांमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांना संधी मिळावी, शासनाच्या विविध समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. राजेश करांडे यांनी येणार्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्ष व अनेक नगरसेवक निवडून येतील, असा निर्धार व्यक्त केला.


प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देणार
जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पक्षाच्या माध्यमातून होईल व येणार्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला संधी मिळवून देणार असल्याचे सांगितले. शासनाच्या संजय गांधी निराधार तसेच विविध शासकीय विविध समित्यांवर आपल्या कार्यकर्त्यांना संधी देणार असल्याचे ते म्हणाले. यावल नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे पक्ष खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. लवकरात लवकर तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष नियुक्त करणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीत माजी युवक तालुकाध्यक्ष अॅड.देवकांत पाटील, युवक शहराध्यक्ष राजेश करांडे, नरेंद्र पाटील, रॉकी पाटील, माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख गुणवंत नीळ, नरेंद्र सोनवणे, विनोद पाटील, जितेंद्र सोनवणे, दीपक तायडे, किशोर माळी, एकनाथ धनगर सह बहुसंख्य कायकर्ते उपस्थित होते.





