वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्टची मुक्ताईनगरात बैठक
मुक्ताईनगर : वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मुक्ताईनगर तालुका महत्वपूर्ण बैठक रविवार, 31 रोजी चांगदेव येथे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे महाराष्ट्र सरचिटणीस सुरेश मोहिते, महाराष्ट्र प्रवक्ते प्रोफेसर राज आटकोरे यांच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली झाली.
यांची बैठकीला उपस्थिती
वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हा महासचिव संतोष कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन मुक्ताईनगर तालुका नुतन कार्यकारीणी तयार करण्याबाबत कामगारांशी चर्चा करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी मुक्ताईनगर तालुका महासचिव रत्नपाल धुळधुळे, अतुल बोदडे, अतुल इंगळे, गौतम इंगळे, गजानन मगरे, बबलू म्हसाणे, रोहित बोदडे, गुणवंत इंगळे, अजय तायडे, निरज बोदडे, ईश्वर म्हस्के, सचिन म्हसाने, अक्षय बोदडे, तेजस सोनवणे, सुमित बोदडे,यश पारधे, सुशील बोदडे, प्रवीण धुंदे, राजेश सावळे, अमर सोनवणे, ईश्वर म्हस्के, योगेश निकम, प्रताप गायकवाड, भूषण इंगळे, विश्वजीत इंगळे, पवन बोदडे, सुरेश कोळी, लक्ष्मण निकम, प्रकाश कोळी, गोकुळ बोदडे आदींसह पदाधिकारी व कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.







