भुसावळ जेसीआय ताप्तीचा दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मान

उत्कृष्ट काम करता आल्याचे समाधान : रजनी सावकारे


Bhusawal JCI Tapti honored with two National Awards भुसावळ : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या भुावळातील जेसीआय ताप्ती क्लबला दोन राष्ट्रीय पुरस्कारांनी नुकतेच बंग्लोर येथे झालेल्या परीषदेत मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. भुसावळ जेसीआय ताप्ती क्लबच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांच्या कार्यकाळात भुसावळातील सर्वात मोठा उंच क्लॉक टॉवर यासह अन्य विविध उपक्रम क्लबने राबवल्याने या कार्याची दखल घेण्यात आली. बंग्लोर येथे झालेल्या परीषदेत संपूर्ण भारतातून ‘बेस्ट लेडी ऑर्गनायझेशन’ तसेच भुसावळ जेसीआय टॉवर उभारल्याबद्दल ‘नॅशनल अ‍ॅवॉर्ड’ देवून गौरवण्यात आले. जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्तिकेएन यांच्याहस्ते झोन 13 चे प्रेसिडेंट जितेंद्र बोरा (नाशिक), झोन व्हा.प्रेसिडेंट डॉ.खुशाल झंवर (अमरावती), माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.निलेश झंवर (भुसावळ), लेडी ऑफिसर स्मृती यांनी पुरस्कार स्वीकारला. संपूर्ण देशभरातील पदाधिकारी या परीषदेला उपस्थित होते.

भुसावळ जेसीआयचा देशभरात ‘डंका’
भुसावळ जेसीआय अध्यक्षपदाची धुरा रजनी सावकारे यांनी सांभाळल्यानंतर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. या माध्यमातून देशभरात भुसावळ जेसीआयचे नाव झळकले. त्यातच केवळ महिलांचा सहभाग असलेल्या संघटनेतर्फे सर्वाधिक उंच टॉवर ही संकल्पनाही यशस्वीरीत्या राबवण्यात आल्याने या कार्याची दखल घेण्यात आली. बंग्लोर येथे झालेल्या राष्ट्रीय परीषदेत संपूर्ण झोन 13 ला तीन पुरस्कार मिळाले. त्यात दोन पुरस्कार जेसीआय भुसावळ ताप्तीला मिळाले तर एक पुरस्कार अमरावतीला मिळाला शिवाय नाशिक येथे झोन 13 च्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भुसावळ जेसीआयला तब्बल 27 पुरस्कारांनी गौरवण्यात आले.


चांगले काम करता आल्याचे समाधान : रजनी सावकारे
पती आमदार संजय सावकारे यांनी जेसीआयमध्ये सहभागासाठी प्रोत्साहन दिल्याने तसेच भक्कम पाठबळ दिल्याने चांगले काम करता आले. सामाजिक उपक्रमांची दखल दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे निश्चित समाधान आहे शिवाय या माध्यमातून भुसावळचे नावही सर्वदूर झळकले आहे. जेसीआयच्या इतिहासात प्रथमच एव्हढा मोठा सन्मान या क्लबला लाभला व त्यासाठी संपूर्ण टीमसह वरीष्ठभांचे सहकार्य लाभले असल्याचे जेसीआय भुसावळ ताप्तीच्या अध्यक्ष रजनी सावकारे यांनी सांगितले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !