जिंकण्याचं मेरीट काँग्रेसमध्ये, रावेर लोकसभेत काँग्रेसच लढणार ! : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्याने खळबळ
Merit of winning in Congress, Congress will fight in Raver Lok Sabha! : Congress State President Nana Patole’s claim stirs up excitement जळगाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रावेर लोकसभा मतदार संघात काँग्रेसच लढणार असल्याचे सुतोवाच केल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा स्वतः लढवणार असल्याचे सुतोवाच केले होते मात्र जळगावात आलेल्या नाना पटोले यांनी जागा जिंकण्याचं मेरीट काँग्रेसमध्ये असल्याचे म्हणत पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.
खडसेंनी केला होता रावेरच्या जागेवर दावा
रावेर मतदारसंघाची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ही जागा मिळाल्यावर प्राधान्याने माझा विचार करावा, अशी विनंती केली असल्याचे एकनाथ खडसेंनी म्हटले होते. परंतू, आता नाना पटोले यांनी या जागेवर काँग्रेसचा दावा सांगितला आहे.


काँग्रेसलाच सुटणार रावेरची जागा !
नाना पटोले म्हणाले की, डॉ.उल्हास पाटील यांना सुद्धा रावेरची जागा लढायची आहे. पण आमच्या पक्षात अशा प्रकारचा आततायीपणा नाही. शेवटी निर्णय हा उच्च स्तरावरच होणार आहे. सर्वांना सोबत घेऊन चालत असताना मेरीटच्या आधारावर निर्णय घ्यावा लागतो. कारण जागा जिंकणं महत्त्वाचं आहे आणि जागा जिंकण्याचं मेरीट काँग्रेसचंच आहे त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच येईल. वरच्या पातळीवर कुठलाही निर्णय झालेला नाही त्यामुळे खाली कुणी काही बोलत असेल त्याला काही अर्थ नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.





