भुसावळातील विद्यार्थ्यांचा चंदीगडमध्ये डंका : बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये निवड


Students from Bhusawal strike in Chandigarh : Selection in Boxing Championship
भुसावळ :
भुसावळातील डी.एल.हिंदी विद्यालयाचे विद्यार्थी तसेच छत्रपती शाहू महाराज अकॅडमीच्या दोन विद्यार्थ्यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये निवड झाली आहे. चंदीगड येथे झालेल्या वेस्ट झोन बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्यानंतर त्यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशीप, चंदिगडसाठी निवड झाली आहे.

2 ते 5 जानेवारीदरम्यान होत असलेल्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये हे खेळाडू उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत आहेत. या खेळाडूंना कोच नरेंद्र अरुण मोरे व कोच धीरज सोनवणे यांच मार्गदर्शन लाभले. भुसावळ येथील छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमीमध्ये हे खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !