भुसावळचे उद्योजक मनोज बियाणी यांची भाजपा व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रकोष्ठच्या उपाध्यक्षपदी निवड


Manoj Biyani, a businessman from Bhusawal, has been elected as the vice-president of the Maharashtra Cell of the BJP Trade Union भुसावळ : भुसावळातील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगरसेवक व बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी यांची भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी महाराष्ट्र प्रकोष्ठच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. भाजपा प्रदेश आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र कुकरेजा यांनी एका पत्रकान्वये ही निवड केली आहे.

व्यापार्‍यांना न्यायासाठी प्रयत्न करणार
भाजपाच्या स्थानिक वरीष्ठ व्यापार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासह व्यापार क्षेत्रातील समस्या सरकारी दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असा आशावाद नियुक्ती पत्रातून व्यक्त करणयात आला आहे. दरम्यान, उद्योजक मनोज बियाणी म्हणाले की, पदाला निश्चितपणे न्याय देण्यात येईल तसेच व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. निवडीनंतर मनोज बियाणी यांचे मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह भाजपा पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !