जितेंद्र आव्हाडांचे मत है वैयक्तिक : आमदार एकनाथराव खडसे
Jitendra Awhad’s opinion is personal: MLA Eknathrao Khadse कोपरगाव : प्रभू श्रीराम यांच्याविषयी जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत असून ते मत संघटनेचे वाटत नाही, असे मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले आहे. निवडणूक काळात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करू नका, असा सल्ला आमदार एकनाथ खडसे यांनी दिला. शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे ’ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची’ या मंथन शिबिरात खडसे बोलत होते.
राज्यात महिलांसह मुलींवर अत्याचार वाढले
खडसे म्हणाले की, राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. महिला, मुलींवर आत्याचार वाढले आहेत. शेतमालाला भाव नाही, सत्ताधारी पक्षाच्या गुंडांना अभय दिले जाते. पोलिस यंत्रणा नाकाम झाली आहे. हेच मुद्दे घेऊन जनतेसमोर जा, असे आवाहन पदाधिकार्यांना केले.







