भुसावळातील महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचा वर्धापनदिन उत्साहात
Mahabali Sports Broadcasting Board in Bhusawal celebrated its anniversary with excitement भुसावळ : शहरातील महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचा अठरावा वर्धापन दिवस वसुंधरा नगरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे होते. प्रमुख अतिथी म्हणून भुसावळ हायस्कूलचे पर्यवेक्षक शशिकांत बाविस्कर, चैत्राम पवार, क्रीडा शिक्षक संजय चौधरी, बी.एन.पाटील, भाजपा शहर चिटणीस श्रेयस इंगळे उपस्थित होते.
विजेत्यांसह गुणवंत खेळाडूंचा गौरव महाबली क्रीडा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप महाजन यांनी मंडळाच्या स्थापनेपासून तर आजपर्यंतचा यशस्वी प्रवास एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला. मंडळाच्या माध्यमातून विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार्या व विजेत्यांसह सर्व गुणवंत खेळाडूंचा सत्कार तसेच मंडळाचे जे सदस्य सरकारी नोकरीवर रुजू झाले अशा खेळाडूंचा सुद्धा सत्कार करण्यात आला.


खेळ काळाची गरज : सतीश सपकाळे
सतीश सपकाळे यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, खेळ काळाची गरज आहे. महाबली क्रीडा प्रसारक मंडळ जी मेहनत घेत आहे त्यासाठी त्यांचे खूप खूप कौतुक आहे व मंडळाला कोणत्याही प्रकारची गरज असल्यास आपण ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन परवेज शेख यांनी तर आभार श्री संत गाडगे महाराज हिंदी जुनियर कॉलेजचे शिक्षक धीरज अग्रवाल यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धीरज धांडे, संकेत माने, टिकाराम पाटील, निलेश इसाळगे, प्रथमेश पाटील, मनीष निकम, भूषण बैसाणे, जीवन नहइदे, भूषण गवळे, विकी खंडारे, गुड्डू भाई, चंद्रकांत भोई, गणेश लोहार, कुणाल माळी तसेच मंडळाच्या सर्व आजी-माजी खेळाडूंनी परीश्रम घेतले.





