अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण रावेरमार्गेच करा

खासदार रक्षा खडसे यांची उच्चस्तरीय बैठकीत नहींला सूचना


रावेर : अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, मंत्री अनिल पाटील, खासदार रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, भोपाळ व नागपूर यांच्या अधिकार्‍यांसोबत शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय महामार्ग बर्‍हाणपूर-अंकलेश्वर रस्त्याचे चौपदरीकरण आधीच्या रावेर या मूळ मार्गानेच करण्यात यावे, अशी सूचना खासदार रक्षा खडसे यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भोपाळ, नागपूरच्या विभागीय अधिकार्‍यांना केली.

देखभाला दुरुस्तीासाठी 61 कोटींचा निधी
बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणासाठी खासदार रक्षा खडसे यांचा मागील काही वर्षांपासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे निरंतर पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार मागील वर्षी राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले. सध्या देखभाल दुरुस्तीसाठी रु.61 कोटी निधी वितरीत करण्यात होता. चौपदरीकरणसाठी डीपीआर तयार झालेला असून हा मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार आहे. रावेर व सावदा शहरास चौपदरीकरणात वगळण्यात असल्याची अफवा पसरविण्यात आली होती त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.


मंत्री गडकरींच्या आदेशानंतर बैठक
हा मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न घेता स्थानिकांच्या मागणीनुसार आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून घेण्यात यावा यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली होती. त्यांच्या आदेशानुसार शुक्रवार, 5 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभागीय अधिकारी, भोपाळ व नागपूर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बर्‍हाणपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळमार्ग रावेर मार्गानेच करण्यात यावे तसेच सध्या चालू असलेली देखभाल दुरुस्ती वेग वाढविण्याबाबत संबधित कंत्राटदारास सुद्धा सूचना खासदार रक्षा खडसे यांनी केल्या.

यांची बैठकीला होती उपस्थिती
बैठकीस खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !