निर्भीड पत्रकारीता जिवंत ठेवणे काळाची गरज
भुसावळात पत्रकारांचा सूर : पत्रकार दिनानिमित्त संतधाममध्ये कार्यक्रम
Keeping fearless journalism alive is the need of the hour भुसावळ : पत्रकारांनी सत्यता पडताळून निर्भीड बातम्या कराव्यात तसेच बदलत्या काळानुसार स्वतःतही बदल घडवून पत्रकारीता करावी व स्वतःला न्याय मिळवून द्यावयाचा असल्यास त्यासाठी एकसंघ असावे, असा सूर भुसावळ येथे पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवर पत्रकारांनी व्यक्त केला. शहरातील जामनेर रोडवरील संतधाममध्ये भुसावळ श्रमिक पत्रकार संघ व व्हाईस ऑफ मिडिया संस्थेतर्फे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त शनिवार, 6 डिसेंबर रोजी पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दर्पणशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
पत्रकारांनी एकसंघ होणे गरजेचे
याप्रसंगी उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांमधून शिक्षक नाना पाटील, दिव्य मराठीचे श्रीकांत सराफ, देशदूतचे संजयसिंग चव्हाण, दैनिक तरुण भारतचे गणेश वाघ यांनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त केले. पत्रकारीतेला सामाजिक दायित्वाची झालर आहे. त्याची जाणीव ठेवून पत्रकारांनी वागणे व काम करणे अपेक्षित आहे. पत्रकारांनी 24 तास सतर्क राहिले पाहिजे व एकोप्याने राहून आपली कौशल्य वाढवणे गरजेचे आहे. राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, कला क्षेत्राचे धागेदोरे एकमेकांशी जोडले गेल्याने पत्रकारांनी सर्व क्षेत्राशी निगडित माहिती ठेवून कार्य करावे. पत्रकारांच्या अनेक समस्या आहेत व या समस्या सुटण्यासाठी पत्रकारांनी एकसंघ होणे गरजेचे असल्याचा सूरही व्यक्त झाला.



यांची कार्यक्रमास उपस्थिती
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, श्रीकांत सराफ, शिक्षक नाना पाटील, गणेश वाघ, वासेफ पटेल, उज्वला बागुल, श्याम गोविंदा, हर्षल पाटील, सुरेंद्रसिंग पाटील, सद्दाम खाटीक, कमलेश चौधरी, विनोद गोरधे, संजय काशीव, सारीका सूर्यवंशी, नवल चव्हाण, डॉ.सुवर्णा गाडेकर, अॅड.जास्वंदी भंडारी, अंजुम खान, सुनंदा दांडगे, सुनीता जोशी, गायत्री विसपुते, अनिता आंबेकर, प्रियंका चौधरी, सुरेंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.





