राज ठाकरे स्पष्टच म्हणाले ; महाराष्ट्राचे नेते मिंधे ; पैशांसाठी वेडे झाले
Raj Thackeray clearly said; Maharashtra leader Mindhe ; Mad for money मुंबई : केंद्रासह राज्यातील सरकारबाबत राज ठाकरे मवाळ भूमिका घेत असल्याची चर्चा अलीकडे होत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ‘सहकार परिषद 2024’ मध्ये राज्यासह केंद्रातील सत्ताधार्यांवर अप्रत्यक्षपणे जोरदार टिकेचे बाण चालवले. आपल्याकडील प्रकल्प हिसकावले जात असून हजारो एकर जमिनी गिळल्या जात आहेत मात्र महाराष्ट्राचे नेते मिंधे झालेले आहेत, पैशांसाठी वेडे झाले आहेत, असा खळबळजनक दावा त्यांनी करीत राज्यात खळबळ उडवून दिली.
तर मुंबईत हे उद्या हात घालतील
ठाकरे म्हणाले की, ज्या निष्ठुरपणे देशातील राजकारण सुरू आहे, ज्याप्रकारे न्यायव्यवस्था सुरू आहे. त्यानुसार उद्या ते मुंबईला हात घालायला मागे-पुढे बघणार नाहीत. महाराष्ट्राचे तुकडे करायला, विदर्भ वेगळा करायला वेळ लावणार नाहीत. हे का होतंय? कारण मराठ्यांनी सव्वाशे वर्ष या देशावर राज्य केलंय, महाराष्ट्र स्वतंत्र मताचा प्रदेश आहे. हेच दिल्लीश्वरांना सतत खुपत आलंय, असा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे.







