भुसावळात वंचित आघाडीत शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

जामनेरात भाजप-काँग्रेस-उबाठा गटाला हादरा


Entry of hundreds of activists into Vanchit Aghadi in Bhusawal भुसावळ : जामनेर विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या तोंडावर वंचित आघाडीत झालेल्या पक्ष प्रवेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वंचित आघाडी सर्व निवडणुकीत लढणार
काँग्रेसचे माजी जामनेर तालुका उपाध्यक्ष अ‍ॅड.राजू शिवाजी मोगरे-पाटील, वाघारी येथील भाजपाचे माजी सरपंच संदीप लोखंडे, शिवसेना (उबाठा) विभाग प्रमुख योगेश गोसावी यांच्यासह जामनेर विधानसभा मतदारसंघातील शेकडो बहुजन वर्गातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वंचित आघाडीत प्रवेश केला. आगामी काळात जामनेर विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक बांधणी करून आगामी सर्व निवडणुका अधिक भक्कमपणे लढवण्याचा निर्धार प्रवेशकर्त्यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.


याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल इंगळे, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव वंदना आराक, जिल्हा संघटक बबन कांबळे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष मीरा वानखेडे, युवक आघाडीचे जिल्हा सचिव मोहन पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे, भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव, भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे, उपाध्यक्ष निलेश जाधव, जामनेर तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन जिल्हा महासचिव अ‍ॅड.योगेश तायडे यांनी केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !