सम्मेद शिखरजी व पंचतीर्थ यात्रा घडवणार्‍या श्री मणिभद्रवीर संस्थेचा भुसावळात सत्कार


भुसावळ : तब्बत 19 वर्षांपासून भारतभराततील विविध ठिकाणी राहणार्‍या जैन समाजातील दिव्यांग व कॅन्सर पीडित समाज बांधवांसाठी पवित्र अशा सम्मेद शिखरजी आणि पंचतीर्थ घडवण्याचे उपक्रम राबवणार्‍या श्री मणिभद्रवीर (दिव्यांग सेवा) संस्थेच्या पदाधिकार्‍यांचा भुसावळ येथे सहृदय सत्कार करण्यात आला. यंदा पंचतीर्थ यात्रा उपक्रमाचे 20 वे वर्ष आहे. श्री मणिभद्रवीर संस्थेच्या महान सामाजिक आणि साहसी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भुसावळ स्थानकावर सकल जैन समाज, विविध धर्मप्रेमी संस्थां आणि भुसावळातील गो सेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री मणीभद्र भक्ती मंडळाचे प्रकाश ढालावत, दिलीप जैन, हेमंत जैन, आशि तसेच इतर पदाधिकार्‍यांचा यावेळी सहृदयी सन्मान करण्यात आला. यावेळी भारतीय शाकाहार संघाचे जिल्हाध्यक्ष चेतन जैन, गो सेवा परीवाराचे रोहित महाले, वीरेंद्र तुरकेले, दि जैन ट्रस्ट बोर्ड भुसावळचे प्रदीप गोसावी, अरुण सुलाखे व समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान, यंदा 300 हून अधिक दिव्यांग धर्मप्रेमींकडून शिखरजी पर्वताची वंदना आणि पंचतीर्थ यात्रा घडवण्यात ये आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !