भुसावळातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये मॅरेथॉन स्पर्धा
Marathon competition at Biyani Military School in Bhusawal भुसावळ : शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत नमो चषक 2024 च्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनसंगी संस्थाध्यक्ष मनोज बियाणी, संस्थेच्या सचिव डॉ.संगीता बियाणी, संस्थेचे कार्यकारी संचालक रोनक बियाणी, आयुशी बियाणी आदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक फौजदार शब्बीर तडवी व सहकारी यांनी बंदोबस्त व वाहतूक सुरक्षेसाठी उपस्थित होते.
900 विद्यार्थ्यांचा सहभाग
मॅरेथॉन स्पर्धेत इयत्ता पहिली व दुसरी प्रथम गट, तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्याचा द्वितीय गट, इयत्ता पाचवी ते सहावी तृतीय गट, इयत्ता सातवी व आठवी विद्यार्थ्याचा चतुर्थ गट व नववी ते बारावी विद्यार्थ्यांचा पाचवा गट असे गट तयार करण्यात आले होते. शाळेच्या एकूण 900 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी यात सहभाग घेतला.


या स्पर्धकांनी मिळवले यश
लहान गट- प्रथम गट- मुली- प्रथम- विभूती दीपक भालेराव, द्वितीय- याशिका समाधान धनगर, तृतीय- मीनल ठाकरे, प्रथम गट- मुले- प्रथम- भावेश हरगोडे, द्वितीय- ज्ञानेश्वर गजानन चौधरी, तृतीय- केतन सुनील पाटील. दुसरा गट- मुली- प्रथम- ज्ञानेश्वरी पाटील, द्वितीय- भावना पाटील, तृतीय- श्रेया पाटील. मुलांमध्ये प्रथम- रीतेश धनगर, द्वितीय- कृष्णा सोनवणे, तृतीय- सानिध्य पाटील. तिसरा गट (मोठा गट) मुली- प्रथम- जागृती वसतकर, द्वितीय- शाश्वती खुळे, तृतीय वैष्णवी कोळी. तिसरा गट- मुले- प्रथम- प्रथमेश चौधरी, द्वितीय- चिंतामण हाके, तृतीय- नचिकेत बोंडे, चौथा गट- मुली- प्रथम- गुंजन कलसेवार, द्वितीय- साक्षी बर्हो, तृतीय- मोना गोले, चौथा गट- मुले- प्रथम क्रमांक- प्रथमेश सुनील पाटील, द्वितीय- वेदांत माटे, तृतीय- यश धनगर, पाचवा गट- मुली- प्रथम- संगीता पावरा, द्वितीय- सानिया तडवी, तृतीय- उज्वला बारेला, पाचवा गट- मुले- प्रथम प्रणव बारेला, द्वितीय- अभय ताराचंद पावरा, तृतीय- अंकुश संतोष पाटील. स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवणार्या धावपटूंचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवून गौरव करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य डी.एम.पाटील तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.





