फुले दाम्पत्याच्या पुढाकाराने स्त्रियांना शिक्षण : सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी
Education to women under the initiative of Phule couple: Assistant Police Inspector Bharat Chaudhary वरणगाव : पुरातन काळामध्ये स्त्रियांनी घराबाहेर निघणे अथवा शिक्षण घेणे हे महापाप होते परंतु अशाही परीस्थितीमध्ये महात्मा फुलेंनी पत्नी सावित्रीबाईला शिक्षित करून इतर महिलांना शिक्षण दिले यामुळेच चूल मूल व घर या पलीकडे महिलांना बाहेर पडता आले. आज जगामध्ये शिक्षणामुळे महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषाच्या खांद्याला लावून काम करत आहे हे केवळ सावित्रीबाईंमुळे शक्य असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक भरतकुमार चौधरी यांनी केले. वरणगाव पोलिस स्टेशनच्या सभागृहामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
हिरकणी फाऊंडेशन मर्यादित दिव्यांग संघटना, महिला दक्षता समिती, शक्ती फाऊंडेशन, अखिल भारतीय समता परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने आई सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजन सविता सखाराम माळी यांनी पोलिस स्टेशन सभागृहात केले. यावेळी वरणगावचे सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी, चंद्रकांत हरी बढे, नगरपरीषदेचे लेखापाल ईशांत नागरे, सामाजिक कार्यकर्ता निवेदिता ताठे, माजी नगराध्यक्ष अरुणा इंगळे, माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी, सुनील माळी, महिला समुदेशन केंद्राच्या भारती म्हस्के-रंधे, हेमलता सोनवणे, माजी नगरसेविका रोहिणी जावळे, डॉ.तनुजा भोईटे, दर्जी फाउंडेशनच्या नसरीन बी., सुनील शेट्टे, भावना प्रजापती, संगीता भांबरे, अंजली ठोमरे, मीनाक्षी ठोमरे, शिल्पा कोलते आदींची उपस्थिती होती.


यशस्वीतसाठी यांचे परीश्रम
कार्यक्रमामध्ये गरजू 60 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. विधवा व अपंग 50 महिलांना साडी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ज्योती गुरव, लक्ष्मी बैरागी, नीलिमा झोपे, रुणाली माळी, जयश्री महाजन, बाळू सैतवाल, राजू माळी, देविदास चव्हाण, सुनील पाटील, मिलिंद वानखेडे, निर्मला जोहरे, कलाबई माळी, सुरेखा बावस्कर, सरुबाई वाघमारे, सईदाबी फकीर, गजानन चव्हाण, सुभाष माळी, बबलू परदेशी, रामा शिवरामे, ईश्वर माळी, माणिक कोळी, शेख रफिक शेख सांडू, रमेश बाबुळकर आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन ज्योती गुरव तर आभार सविता माळी यांनी मानले.





