स्नेहसंमेलनातूनच घडतात कलाकार : प्राचार्या जयश्री पुराणिक

विवरे येथील बेंडाळे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात


रावेर : जीवनातील यशाचे बीज आपल्या शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमातून रुजविले असतात. शाळेतील नृत्य नाट्य यात केलेले अभिनय सशक्त असल्यास चित्रपट सृष्टीतील कलाकार घडतात, असे प्राचार्या जयश्री पुराणिक म्हणाल्या. विवरे येथील ग.गो.बेंडाळे हायस्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासीठावर कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या जयश्री कुलकर्णी-पुराणिक, मधुस्नेह परिवाराचे समन्वयक विवेक ठाकरे, निंभोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरीदास बोचरे, रावेर विकासोचे चेअरमन तुषार मानकर, शिक्षण विकास मंडळ विवरे चेअरमन धनजी लढे, सचिव शैलेश राणे, अध्यक्ष मार्तंड भिरूड, संचालक रमेश पाचपांडे, गोपाळ राणे, दिलीप राणे, केशव राणे, निंभोरा ग्रामपचायत सदस्य दस्तगीर खाटीक, मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली बेंडाळे, पर्यवेक्षक आर.टी.कोल्हे, केंद्रप्रमुख दीपक सोनार उपस्थित होते. प्रास्ताविक शिक्षण विकास मंडळ विवरे सचिव प्रा.शैलेश राणे तर सूत्रसंचालन नीलिमा नेमाडे यांनी केले. ग्राम गौरवचे संपादक विवेक ठाकरे यांनी सांगितले की, शाळा हे व्यक्ती विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. स्नेसंमेलनातून गुणवान आणि सुजाण नागरिकतेची शिकवणदेखील रसिकांना मिळते. स्नेसंमेलनात प्राथमिक शाळेच्या 17 व माध्यमिक शाळेतील 22 कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. यात 350 विद्यार्थी सहभागी झाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !