भुसावळात श्रीनगर ते अयोध्या नगरात कलश यात्रा उत्साहात
आमदार संजय सावकारे यांचा सपकाळे : जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे यांच्यातर्फे आयोजन
Kalash Yatra in excitement from Srinagar to Ayodhya city in Bhusawal भुसावळ : भुसावळ शहरातील श्रीनगर ते अयोध्या नगर भागात कलश यात्रा काढण्यात आली. प्रभू श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या आमंत्रण अक्षदा अयोध्या येथून आल्या असून त्यानिमित्ताने कलश यात्रा आणि 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण परीसरातील नागरीकांना देण्यात आले. आमदार संजय सावकारे यांनी या यात्रेत सहभाग नोंदवला.
सजीव देखाव्याने वेधले लक्ष
श्रीनगर, भोई नगर, अष्टविनायक कॉलनी, स्वरूप कॉलनी, हुडको कॉलनी, अयोध्या नगर येथे कलश यात्रेदरम्यान प्रभू श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांचा सजीव देखावा साकारण्यात आला. परीसरातील शेकडो महिलांनी धार्मिक भजन गायले. संपूर्ण परीसरात रस्त्यावर रांगोळी काढण्यात आली व परीसरात दिवे लावण्यात आले.


श्रीराम मंदिरात प्रभागाच्या माजी नगरसेविका अनिता सपकाळे व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे यांनी आरती केल्यानंतर कलश यात्रेची सांगता झाली. याप्रसंगी भाजप शहर चिटणीस अमोल पाटील, पदवीधर प्रकोष्ठच्या तालुका संयोजिका प्रा.सीमा पाटील, लक्ष्मीकांत इंगळे, धनसिंग बोरणारे, प्रा.धीरज पाटील व परीसरातील मान्यवर सहभागी झाले होते.





