भुसावळच्या डॉ.संगीता बियाणी पुण्यात नारी भूषण पुरस्काराने सन्मानीत


Dr. Sangeeta Biyani of Bhusawal honored with Nari Bhushan Award in Pune भुसावळ : पुण्यातील ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनतर्फे पुण्यातील यशदा ऑडीटोरीयममध्ये भुसावळातील बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता मनोज बियाणी यांना राज्यस्तरीय नारीभूषण पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

यांची प्रमुख उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री सुधारक ओळवे होते. यावेळी ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील बेळगावे, सचिव अंकिता ताम्हणकर, प्रोजेक्ट डायरेक्टर ग्रीष्मा जाधव उपस्थित होत्या. प्रसंगी ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनने महाराष्ट्रातील टॅलेन्ट 83 मान्यवरांना सन्मानीत केले.


डॉ.बियाणी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
यापूर्वीही डॉ.संगीता बियाणी यांच्या दखल घेत देशभरातून विविध पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनतर्फे ज्ञान भूषण, समाज भूषण, विधी भूषण, साहित्य भूषण, क्रीडा भूषण, छात्र भूषण, उद्योग भूषण, सेवा भूषण, कृषी भूषण, कला भुषण, नारी भूषण असे विविध पुरस्कार यावेळी देण्यात आले. डॉ संगीता बियाणी यांना राज्यस्तरीय नारीभूषण पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, कांताबाई बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, मुस्कान बियाणी, पियुष बियाणी, राजू पाारीख, प्रवीण भराडिया, गोपाल ठाकूर यांच्यासह नातेवाईकांनी पुरस्कार मिळाल्यानंतर डॉ.बियाणी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !