हिंदू द्रोही बेताल वक्तव्य करणार्या जितेंद्र आव्हाडवर गुन्हा नोंदवा
भुसावळात समस्त हिंदु संघटना गोरक्षकांकडून निवेदन
File a case against Jitendra Awad who made baseless statements against Hindus भुसावळ : प्रभू श्रीरामचंद्राबाबत अपशब्द वापरणार्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी हिंदू संघटनातर्फे पोलिस निरीक्षकांना निवेदन देऊन करण्यात आली. देशाचे आराध्य दैवत श्रीरामप्रभू यांच्या बद्दल अपशब्द वापरला यामुळे हिंदू संघटनांतर्फे जितेंद्र आव्हाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, त्यांची हकालीपट्टी करीत आमदारकी रद्द करावी, आव्हाड यांच्याबद्दल हिंदू संघटनांतर्फे त्यांचा निषेध करण्यात आला.
भूषण महाजन व रोहित महाले यांनी या संदर्भात निवेदन दिले. संतप्त हिंदू बांधवांची मने दुखावण्याचा प्रयत्न करत देशात अराजकता पसरविण्याचे काम सुरू आहे. लवकर आव्हाड याच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा गोरक्षक संघटना, हिंदू संघटनांकडून देण्यात आला आहे.







