सरसकट पीक विमा न मिळाल्यास विवरेत 12 रोजी रास्तारोको


If you don’t get total crop insurance, stop on the 12th रावेर : रावेर तालुक्यातील विवरे येथील शेतकर्‍यांनी केळी पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी रावेर तहसील गाठत तहसीलदार बी.ए.कापसे यांना निवेदन दिले. शेतकर्‍यांना सरसकट केळी पीक विम्याचा लाभ मिळावा अन्यथा शुक्रवार, 12 जानेवारी रोजी विवरे येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शेतकर्‍यांनी जोरदार घोषणा देऊन परीसर दणाणून सोडला.

शेतकर्‍यांच्या संयमांचा बांध सुटला
शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, केळी पीक विमा आम्ही विविध बँकांच्या माध्यमातून सुविधा केंद्रातून रीतसर काढलेला आहे. निंभोरा मंडळातील शेतकरी वरील फळ पीक विम्यासाठी पात्र असतांना सुध्दा अद्यापपर्यंत बर्‍याच शेतकर्‍यांना मंजूर विम्याची रक्कम मिळालेली नाही. सर्व शेतकरी यांनी काटकसर करीत विमा रक्कम भरल्यानंतरही नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळालेली नाही त्यामुळे शेतकर्‍यांचा सुबुरीचा बांध फुटून शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


तर 12 रोजी रास्तारोको
येत्या 12 जानेवारीपर्यंत निंभोरा मंडळातील केळी पीक विम्याची रक्कम पूर्ण शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा न झाल्यास शुक्रवार, 12 जानेवारी रोजी बर्‍हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे दिला. यावेळी शिवाजी पाटील, रफिक शेख, किशोर पाटील, विपीन राणे, संतोष पाटील, अरुण विवरेकर, गोपाळ पाटील, गोपाळ राणे, गोपाळ परदेशी, नाना साळुंके, राहुल पाटील, रवींद्र पाटील, हितेंद्र राणे, सचिन पाटील, पंकज बोंडे, रमाकांत पाटील, विनोद मोरे, चेतन बोंडे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !