राज्यातील सत्तासंघर्ष : 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेवर अंतिम निकल
Power struggle in the state : Final verdict on Shiv Sena MLA disqualification on January 10 मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाच्या अंतिम निकालाची घडी अवघ्या काही तासांवर आली आहे. विधी मंडळातील सुनावणी आता पूर्ण झाल्यानंतर शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी बुधवार, 10 जानेवारी रात्री दुपारी चार वाजेदरम्यान निकाल हाती येण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील दोन्ही गटातील आमदार अपात्रतेवरुन सुनावणी सुरू असून आता अंतिम निकाल काय हाती येतो ? याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीने खळबळ
आमदार अपात्रता प्रकरणाला अवघे तीन दिवस शिल्लक असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या भेटीचे स्पष्ट कारण कळू शकले नसलेतरी तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. अपात्र आमदारांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. हा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास त्यांचे मुख्यमंत्रिपद अडचणीत येऊ शकते व त्यातून राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यापूर्वीच नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली मात्र काय चर्चा झाली याचा तपशील मात्र उघड झालेला नाही.


10 रोजीच्या निकालाकडे देशाचे लागले लक्ष
गेल्या काही दिवसापासून शिवसेनेतील आमदारांची सुनावणी सरू आहे. सुप्रीम कोर्टाने शिवसेनेतील आमदार अपात्रतेचा निकाल 31 डिसेंबरपर्यंत देण्याची मुदत दिली होती. ती मुदत पुन्हा वाढवून देण्यात आली. आता हा निकाल काय लागणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. आता हा निकाल काय लागणार यावर राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







