मुक्ताईनगर शहरातील अवैध उघड्यावरील मांस विक्री बंद करा
शहरातील सेवाभावी संस्था व सामाजिक संघटनांनी दिले निवेदन
Stop illegal open sale of meat in Muktainagar City मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहरात उघड्यावर सुरू असलेली अवैध मांस विक्री बंद करावी, अशी मागणी शहरातील विविध संघटनांनी तहसीलदार, नगरपंचायत व पोलिस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुक्ताईनगर शहराला संतांचा वारसा लाभलेला पुण्यभूमी आहे. येथे श्री क्षेत्र संत मुक्ताईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात व तालुक्यातील विद्यार्थी शिक्षणासाठी मुक्ताईनगरात येतात यामुळे विद्यार्थ्यांवर दुष्पपरीणाम होतात, असे निवेदनात नमूद आहे.
तर टाळ-मृदुंगासह आंदोलनाचा इशारा
रस्त्यामध्ये पडलेल्या रक्त मांसाच्या तुकड्यांमुळे परीसरात दुर्गंधी, अस्वछता, रोगराई पसरते व खाली पडलेल्या तुकड्यांसाठी भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. मोठ्या प्रमाणावर उघड्यावर होणारी मांस विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अन्यथा टाळ मृदुंगासह उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा मुक्ताईनगर पंचक्रोशीतील रमरोटी आश्रम, संत मुक्ताई बहुउद्देशीय संस्थान, भारतीय जैन संघटना, नवकर जैन संघटना, श्री स्वामी समर्थ केंद्र व अध्यात्मिक बालसंस्कार केंद्र, साई प्रतिष्ठान, जागृत हनुमान मंदिर (हरताळा), बजरंग दल, श्रीराम सेना, वारकरी सांप्रदाय, विश्व हिंदू परीषद, सनातन धर्म संस्था, ओम साई सेवा फाऊंडेशन, वंदे मातरम ग्रुप (मुक्ताईनगर), नागेश्वर मित्र मंडळ, गायत्री परिवार, इस्कॉन सतसंग परीवार, स्वाध्याय परीवार, सद्गुरू बैठक परीवार, जय गुरुदेव परीवार, विश्वकर्मा सुतार समाज संघटना, सिव्हील सोसायटी संघटना व मुक्ताईनगर पंचक्रोशीतील दुर्गा मंडळ व गणेश मंडळ यांच्या वतीने मुक्ताईनगर नगरपंचायत व तहसीलदार व मुक्ताईनगर पोलिस निरीक्षकांना देण्यात आले आहे.







