साकळी ते श्री क्षेत्र शेगांव पदयात्रा रवाना
यावल : यावल तालुक्यातील साकळी येथील श्री गजानन महाराज फाऊंडेशन व साकळी मित्र मंडळातर्फे श्री गजानन महाराज देवस्थान जोशी फार्म साकळी येथून रविवार, 7 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता श्री क्षेत्र शेगांव येथे पदयात्रा पालखी रवाना झाली. यंदा पालखी सोहळ्याचे 13 वे वर्ष होते. पालखी श्री गजानन महाराज देवस्थान जोशी फार्म मनवेल रोड साकळी येथून निघाली पालखी अंजाळे, ता.यावल येथे आल्यानंतर पालखीचे स्वागत करण्यात आले.
दिंडीतील सेवेकर्यांना फराळ वाटप
यावेळी पदयात्रेतील सहभागी भाविकांना मनवेल येथील सामाजिक कार्यकर्ते व माऊली अॅग्रोचे संचालक भरत रामसिंग पाटील यांच्याकडून एकादशी असल्याने उपवासाचा फराळ देण्यात आला. यानंतर गजानन महाराज यांची पालखी पुढील मार्गावर रवाना झाली. अंजाळे, ता.यावल येथील प्रसिद्ध शनिमंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर सहभागी भाविकांनी फराळाचा आनंद घेतला.







