जळगाव जिल्हा पोलिस दलात बदल्यांचे वारे ! ; 13 पोलिस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर होणार बदली

Winds of transfers in Jalgaon District Police Force! ; 13 police inspectors will be transferred outside the district जळगाव : लोकसभा निवडणुकीला दोन महिन्यांचा अवकाश असलातरी या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दलात बदल्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून एका जिल्ह्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकार्यांच्या बदलीचे आदेश पोलिस दलाला प्राप्त झाले असून जळगाव जिल्ह्यातील 13 पोलिस निरीक्षकांसह 27 सहाय्यक पोलिस निरीक्षक व 23 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांची शक्यता आहे. जे अधिकारी मूळ जिल्ह्यात सेवा बजावित असून ते बदलीस पात्र असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिक परीक्षेत्रात होणार बदली
जळगाव जिल्ह्यातील जे अधिकारी बदली पात्र असून त्यांची बदली नाशिक परिक्षेत्रातंर्गतच होणार आहे. ज्या अधिकार्यांनी मूळ रहिवासी असलेल्या ठिकाणी सेवा बजावली आहे त्यांची मुख्यत्वे बदली होणार आहे. बदलीपात्र अधिकार्यांना परिक्षेत्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये बदली होवून जावे लागणार आहे.

अधिकार्यांकडून मागविले तीन पसंतीक्रम
जिल्हा पोलिस दलाने बदलीपात्र अधिकार्यांची यादी तयार करण्यात आली आहे. बदली होणार्या संबंधित अधिकार्यांकडून तीन पसंती क्रमांक मागवले आहेत. तसे पत्र अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांनी काढले आहे. ज्या अधिकार्यांनी पसंती क्रमांक दिला नाही, त्यांची माहिती निरंक समजण्यात येणार असल्याचेही पत्रात नमूद आहे.
या पोलिस अधिकार्यांची होणार बदली
सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, रामानंदनगर पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, चोपडा शहर पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील, भडगाव पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील, नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, चाळीसगाव ग्रामीण पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, पाचोरा पोलिस निरीक्षक राहुल खताळ, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक विलास शेंडे, पारोळा पोलिस निरीक्षक सुनील पवार, पहूरचे पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह निलंबीत असलेले किरणकुमार बकाले व भुसावळचे तत्कालीन निरीक्षक राहुल गायकवाड यांची देखील बदली होणार आहे.
