व्ही.एच.पटेल विद्यालयाच्या आनंद मेळाव्यात बच्चे कंपनीने घेतला खरी कमाईचा अनुभव : स्काऊटच्या कब – बुलबुल विभागाचा उपक्रम

दिड हजार विद्यार्थ्यांचा सहभाग, खाऊगल्लीत खाद्यपदार्थांची रेलचेल


चाळीसगाव : चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित व्ही. एच. पटेल प्राथ.विद्यालयाचा आनंद मेळावा बुधवारी उत्साहात झाला. उद्धाटन संस्थाध्यक्ष रामकृष्ण पाटील व शाळा समितीचे अध्यक्ष जितेंद्र वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे उपाध्यक्ष योगेश अग्रवाल, उपाध्यक्ष मिलिंद देशमुख, सचीव डॉ. विनोद कोतकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष सुरेश स्वार, मुलींच्या शाळेचे अध्यक्ष प्रदीप अहिरराव, संचालक मु.रा. अमृतकार, एच. एच. पटेल प्राथ. विद्यालयाचे अध्यक्ष अशोक बागड, सराफ इंग्लिश मिडियम स्कुलचे अध्यक्ष नीलेश छोरिया, क्रीडा समितीचे अध्यक्ष योगेश करनकाळ, शिक्षक प्रतिनिधी उपप्राचार्य डॉ. अजय काटे, मुख्याध्यापिका सुलोचना इंगळे, के.एन.तडवी, रमेश सोनवणे, सुनील पाटील, अविनाश घुगे आदि उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापिका मंजुषा हरी नानकर व त्रिशला निकम यांनी केले. सूत्रसंचालन व आभार जिजाबराव वाघ यांनी मानले. आनंद मेळावा प्रमुख सचिन चव्हाण, परेश चव्हाण यांच्यासह सचिन पाखले, दत्तात्रय गवळी, रोहित चव्हाण यांच्यासह शिक्षक वृंदाने सहकार्य केले.

खाऊगल्लीत ३० स्टॉल
शाळा परिसरात खाद्य पदार्थांचे स्टॉल असणा-या खाऊगल्लीत बच्चेकंपनीने मौज केली. भेळ – पकोडी, पाणीपुरी, इडली – सांबर, ढोकळे, पाववडे अशा विविध खाद्य पदार्थांचे स्टल लावण्यात आले होते. दिड हजार विद्यार्थ्यांसह पालक – शिक्षकांनी सहभाग घेतला.


विद्यार्थ्यांनी स्काऊटच्या उपक्रमातील खरी कमाईचा अनुभव घेतला. ३०हून अधिक स्टॉल लावले गेले.

कविता साळुंखे, ज्योती कुमावत, दिपाली चौधरी, स्मिता अमृतकार, रेखा चौधरी, मनिषा पाटील, माधुरी दायमा, तेजश्री जगताप, स्वप्ना चौधरी आदि शिक्षिकांनी स्वतः खाद्यपदार्थ तयार करुन स्टॉल लावले होते. संस्था पदाधिका-यांनी उपक्रमाचे कौतुक केले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !