भुसावळात उबाठा गटातर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निषेध


Protest against Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar by Ubatha group in Bhusawal भुसावळ : शिंदे गटाची शिवसेना वैध असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवार दिल्यानंतर संतप्त ठाकरे गटातील शिवसैनिकांनी कपाळाला काळ्या पट्या बांधत यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. यावेळी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निषेेधाच्या घोेषणा देण्यात आल्या.

चुकीचा निकाल : शिवसैनिक संतप्त
शिवसेना ही कुणाची ? हे जनतेला माहिती असून नार्वेकरांनी दिलेला हा निकाल चुकीचा असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. भुसावळ शहराध्यक्ष दीपक धांडे यांच्या नेतृत्वाखाली मुकेश गुंजाळ, सुरज पाटील, हेमंत बर्‍हाटे, दिलीप सुरवाडे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी पुतळा चौकात जवळपास 15 मिनिटे आंदोलन केले. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !