भुसावळातील बियाणी पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये क्रीडा स्पर्धा उसाहात


भुसावळ  : शहरातील बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच बियाणी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स ध्ये भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य द्वारा पुरस्कृत नमो चषकच्या अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धां उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.चारुलता तुषार पाटील होत्या. बियाणी एज्युकेशन गु्रपचे अध्यक्ष मनोज बियाणी, बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, रोनक बियाणी, आयुषी बियाणी, राजेश पारीख, प्रवीण भराडिया आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.चारुलता पाटील यांनी विद्यार्थ्यांना भ्यासाबरोबरच खेळाचे महत्व पटवून मोलाचे मार्गदर्शन केले. विजेत्या स्पर्धकांचे सर्वांनी कौतुक केले. शाळेतील साडेचारशे विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. मुख्याध्यापक रुद्रसेन गंठिया यांनी आभार मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !