भुसावळात पालिका उद्या यावल रोडवरील अतिक्रमणही हटवणार !


Bhusawalat municipality will also remove the encroachment on Yaval road tomorrow! भुसावळ : भुसावळ शहरातील यावल रोडवरील अतिक्रमण पालिकेतर्फे शुक्रवारी हटवण्यात येणार आहे. अतिक्रमण हटवण्यासंदर्भात ध्वनीक्षेपकाद्वारे पालिकेने गुरुवारी विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत.

यावल रोडवरील अतिक्रमण पुन्हा निघणार
शहरात सर्वाधिक डोकेदुखी अतिक्रमणाची आहे. अलीकडे प्रशासकांनी यावल रोडवर अतिक्रमण हटाव मोहिम राबवली होती मात्र नंतर पुन्हा मोहिमेला ब्रेक लागल्याने पुन्हा ‘जैसे थे’ चित्र झाले मात्र आता शुक्रवार, 12 रोजी पुन्हा यावल रोडवरील तापी नदी पूल ते महात्मा गांधी पुतळा चौक परीसर व न्यायालयाच्या बाजूचा व पाठीमागील भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याचे प्रशासक जितेंद्र पाटील यांनी कळवले आहे. दरम्यान, पालिकेने गुरुवारी रात्री व्यावसायीकांनी अतिक्रमण हटवण्याबाबत माईकद्वारे सूचनाही दिल्या आहेत.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !