फैजपूरात अनुगामी लोकराज्य महा अभियान अंतर्गत श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा


फैजपूर : राष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कृती योजना नेतृत्व विचाराने सामाजिक एकात्मिक विकासात अग्रेसर असलेल्या अनुलोम सामाजिक संस्था आणि आश्रय फाउंडेशन, रावेर-यावल यांच्या विद्यमाने अनुगामी लोकराज्य महाभिमान अंतर्गत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती व राष्ट्रीय युवा दिनी फैजपूर येथील सतपंथ देवस्थान धर्मशाळा सभागृहात संस्थाध्यक्ष तथा अखिल राष्ट्रीय संत समितीचे कोषाध्यक्ष महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली श्रीराम मूर्ती प्रदान सोहळा म झाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
महामंडलेश्वरांच्या हस्ते 310 वस्ती स्थान मित्रांना पंचधातूची धनुर्धारी श्रीरामाची मूर्ती श्रीरामाच्या जय घोषात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. शेकडो वर्षांपूर्वी रामजन्मभूमीचा मुक्ती संघर्ष नुकताच संपुष्टात येऊन या जागी श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा भव्यदिव्य सोहळा सोमवार, 22 जानेवारी रोजी विश्वस्तरावर होत आहे. सुवर्ण क्षणांची अमृतदायी प्रेरणा आपल्या मनात सातत्याने स्मरत राहावी आपले सारे कुटुंबीय भावी पिढ्यांनी हे स्मरण सातत्याने ठेवावे या उद्देशाने हा श्रीराम मूर्ती प्रधान सोहळा होत असल्याची भावना आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेंद्र सिंह राजपूत यांनी तर आभार तुषार महाजन यांनी मानले. प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष राकेश जैन, धीरज महाजन, दिनेश बारेला, नथ्थू धांडे, सागर लोहार, स्नेहल फेगडे, रीतेश बारी, युगल घारू. संदीप भारंबे, जयेश कोल्हे, नीरज झोपे, नंदकिशोर अग्रवाल, रवींद्र सरोदे, कडू मुखी यासह मोठ्या संख्येने मान्यवर रामभक्त उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !