आक्षेपार्ह वक्तव्य : निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
दिड वर्षानंतर किरणकुमार बकाले पोलिस यंत्रणेपुढे सरेंडर : न्यायालयाला आले छावणीचे स्वरूप
Offensive statement about Maratha community : Suspended Inspector Kiran Kumar Bakale of Jalgaon Crime Branch sent to police custody for two days जळगाव : मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर तब्बल दिड वर्षांपासून पोलिसांना चकवा देणारे जळगाव गुन्हे शाखेचे निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले हे सोमवारी पोलिसांना शरण आले. दुपारी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिस यंत्रणेचा दबाव वाढताच बकाले हजर
स्थानिक न्यायालयासह हायकोर्टाकडूनही दिलासा मिळाला नसल्याने निलंबित निरीक्षक किरणकुमार बकालेंच्या पदरी निराशा पडली होती तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाने त्यांच्याविरोधात स्टॅण्डींग वॉरंट काढत मालमत्ता जप्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता. आपल्या सभोवताच्या अडचणी वाढत चाललेल्या पाहून बकाले यांनी सोमवारी पोलिसांपुढे शरणागती पत्करली.


न्यायाधीशांनी सुनावली कोठडी
निलंबित निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्यानंतर त्याबाबतची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राज्यातील मराठा समाजात आजही संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी बकाले पोलिसांना शरण आल्यानंतर त्यांना सोमवारी दुपारी न्यायालयात नेण्यात येणार असल्याचे प्रचंड पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी बकाले यांना न्या.केळकर यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपासाधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यावेळी उपस्थित होते.
या कारणास्तव बकालेंचा सुरू होता शोध
मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी विनोद देशमुख यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बकाले यांना निलंबित केल्यानंतर नाशिक येथे हजर होण्यास सांगण्यात आले होते मात्र, हजर न होता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज टाकण्यात आला होता परंतू तेथे देखील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात होता.
जळगाव होम डिवायएसपींकडे तपास
या प्रकरणाचा तपास जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्याकडून काढून, तो होम डीवायएसपी संदीप गावित यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.





