विकासकामांना निधी आणि शासकीय योजनांना पाठपुरावा कमी पडून देणार नाही : आमदार मंगेश चव्हाण
मांदुर्णे येथील 2 कोटी 65 लाखांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण ः मांदुर्णे, सायगाव, अलवाडी आदिवासी भिल्ल समाजातील 161 कुटुंबाना कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटप
Funding for development works and follow-up of government schemes will not go down : MLA Mangesh Chavan मांदुर्णे, ता.चाळीसगाव : आमदार म्हणजे कुणी मोठा माणूस नसतो, पूर्वी राजाचा पोटी जन्माला यायचा तो राजा व्हायचा आता जनतेच्या मतपेटी मधून जो जन्माला येतो त्याला लोकप्रतिनिधी म्हणतात. आम्ही म्हणजे राजे नसून जनतेचे सेवक आहोत. शासन आम्हाला पगार, सुविधा देतेे त्या तुमच्या सेवेसाठी म्हणून चाळीसगाव तालुक्याचा आमदार झाल्याच्या पहिल्या मिनिटापासून मी चाळीसगाव वासीयांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले आहे. मी तुमच्या सेवेसाठी कामावर असलेला पगारी माणूस आहे, अशी माझी नम्र भावना आहे. रस्ते, गटार, वॉटर, मीटर या विकासकामांसोबतच शासनाच्या योजना, सोयी सवलती त्यांना मिळवून देणे, प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणींची सोडवणूक करणे हे माझे काम आहे. त्यासाठी मी व माझे कार्यालय कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते रविवार, 14 रोजी मांदुर्णे गावातील 2 कोटी 65 लाखांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी बोलत होते. गावाच्या विकासासाठी अजून 25 लाखांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी मांदुर्णे, सायगाव, अलवाडी, भवाळी गावातील 161 हून अधिक आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबाना जात प्रमाणपत्र व रेशनकार्ड वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, मार्केट कमिटी चे सभापती – कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश तात्या सोनवणे, रवी आबा पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निक, किसान मोर्चा अध्यक्ष- विजय पाटील पिलखोड, ग्रामपंचायत सरपंच- सुनंदा दगडू पाटील तसेच दगडू गणपत पाटील, उपसरपंच – गोरख आत्माराम पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य, सुनील पाटील तसेच मार्केट संचालक रवींद्र पाटील (भावडू दादा), संभाजीराजे पाटील, विकाससो चेअरमन – जितेंद्र पाटील, संजय गांधी योजना कमिटीचे आबा बछे सायगाव, रोहन सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सायगाव सरपंच- कमलाबाई भिल्ल, यशवंत यशोद (पिलखोड सरपंच), गोकुळ रोकडे (उपसरपंच), छोटू मगर (उपखेड सरपंच), गोरख आप्पा पाटील, ज्ञानेश्वर पाटील अलवाडी, दिनेश माळी सायगाव, नाना धर्मराज. राजेंद्र सुभाष पाटील (मा.चेअरमन वि.का.सो.) माजी सरपंच – शिवाजी कृष्णा पाटील, नामदेव माधवराव पाटील, वसंत नारायण पाटील, दगडू आत्माराम पाटील, वाल्मिकी नागो पाटील, सयाजी पाटील, पोलीस पाटील विष्णू पाटील तसेच वासुदेव पाटील, कैलास दशरथ पाटील, महेंद्र पाटील, डॉ.संदेश महाजन, दगडू उत्तम पाटीलमहेश पाटील, महेश भावसार, पिनू आबा, राजू टेलर, गोरख पाटील, बूथ प्रमुख – योगेश पाटील देशमुखवाडी, निहाल मन्सूरी, सोपान अहिरे यांनी सहकार्य केले.



विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन
प्रसंगी आमदार मंगेशदादा चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते मांदुर्णे गावातील जलजीवन मिशन अंतर्गत 86 लाखांची पाणी पुरवठा योजना, पिलखोड ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे. (74.39 लक्ष), साकुर फाटा ते मांदुर्णे रस्ता डांबरीकरण करणे (30 लक्ष), मुलभूत सुविधा निधी अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे (25 लक्ष) व सभामंडप बांधकाम करणे (20 लक्ष), जि प शाळा खोली बांधकाम करणे (12.15 लक्ष) शिवाजी पाटील ते छगन पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे (10 लक्ष), सायगाव व मांदुर्णे नदी तून जाणार्या नवीन कृषी वीज वाहिनीचे काम करणे (8 लक्ष) आदी कामांचे लोकार्पण व भूमिपुजन करण्यात आले.
तसेच मांदुर्णे येथील आदिवासी भिल्ल कुटुंबाना 73 रेशनकार्ड व 49 जातीचे प्रमाणपत्र, अलवाडी येथील 25 कुटुंबाना रेशनकार्ड, सायगाव येथील 14 कुटुंबाना जात प्रमाणपत्र, भवाळी येथील 6 कुटुंबाना जात प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.





