वरणगावात भूमिगत वीज वाहिनीसह रस्ता दुभाजकांवर स्ट्रीट लाईटची मागणी


Demand for street lights at road bifurcations with underground power line in Varangaon वरणगाव : वरणगावातील नागेश्वर महादेव मंदिर रेल्वे स्टेशन ते तिरंगा सर्कलच्या दरम्यानची वीज वाहिनी भूमिगत टाकण्यात यावी तसेच दुभाजक करून मध्यभागी लाईट लावावेत, फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिर दरम्यानच्या रस्त्यावर दुभाजक आणि लाईट लावावेत तसेच तिरंगा सर्कल ते भोगावती नदी व रावजी दरम्यान वीज पोल काढून भूमिगत लाईन टाकण्यात यावी व मध्यभागी दुभाजक टाकण्यात यावे या मागणीसाठी भाजपातर्फे वरणगाव तिरंगा सर्कल येथे नागरीकांचे स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. यावेळी 1016 लोकांनी स्वतः येऊन स्वाक्षरी म्हणून जनहिताच्या मागणीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सुनील माळी, युवा अध्यक्ष आकाश निमकर, गोलू राणे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, रामभाऊ माळी, बळीराम सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, नाना चौधरी, साबीर कुरेशी, मुस्लिम अन्सारी, उपनगर अध्यक्ष शेख अखलाक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर तायडे, वैभव अहिरराव, वरणगाव नगरपरीषदेचे मुख्याधिकारी समीर शेख, मिलिंद मेंढे, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील, रमेश पालवे, नामदेवराव सोनवणे, नितीन पाटील, माजी प्राचार्य के.एम.पाटील, राहुल जंजाळे, नंदू जोशी, संतोष कश्यप, डॉ.सादीक शेख, योगेश माळी, दत्तात्रय सुर्यवंशी, महेश सोनवणे, शालिग्राम डोयसे, विजय तोत्ताणी आदी उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चंद्रशेखर तायडे, मुख्याधिकारी समीर शेख यांना एक हजारांवर लोकांच्या सह्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !