शेतकर्यांना केळी पिक विम्याची रक्कम मिळाल्यास आंदोलन
मोरगावच्या शेतकर्यांचा इशारा : नायब तहसीलदारांना निवेदन
Protest if farmers get banana crop insurance amount रावेर : रावेर तालुक्यातील मोरगाव येथील शेतकर्यांनी केळी पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी रावेर तहसील गाठत निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांना निवेदन दिले.
पीक विमा न मिळाल्याने शेतकरी संतप्त
पीक विम्याचा लाभ न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. निवेदनाचा आशय असा की, शेतकर्यांची रीतसर केळी पीक विमा काढलेला आहे. 2022-23 या वर्षाची केळी पीक विम्याची रक्कम आजपर्यंत शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेली नाही त्यामुळे शेतकर्यांचा सबुरीचा बांध फुटून शेतकर्यांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे. तत्काळ शेतकर्यांची केळी विम्याची रक्कम द्यावी अन्यथा भोकरी गावाजवळ बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा संतप्त शेतकर्यांनी दिला आहे.


निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, अनिल पाटील, वाय.व्ही.पाटील, बाळू पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.





