देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले : मुंबईत काही मोकाट रेडे सुटलेत !


Devendra Fadnavis clearly said : There are some free raids in Mumbai! कराड : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी कराडच्या कृषी प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर भाषणादरम्यान आयोजकांचे कौतुक केले. ते म्हणाले की, इथल्या प्रदर्शनात 42 लाखांचा बैल आला असून इलेक्ट्रॉनिक बैलही आला आहे व बुटकी गायही आली आहे मात्र आमच्या मुंबईत मोकाट रेडे सुटले आहेत त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना असल्यास सांगाव्यात, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली.

रेड्यांचा बंदोबस्तासाठी विचारल्या उपाययोजना
कराड येथे कृषी प्रदर्शनात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची काही योजना तुमच्याकडे असेल तर सांगा. ते इतके टीव्हीवर बोलतात. त्यामुळे तुमच्याकडे काही योजना अथवा तंत्रज्ञान याठिकाणी आले असेल त्याचाही उपयोग कसा करता येईल हे आम्हाला तुम्ही शिकवा. हे अतिशय सुंदर प्रदर्शन याठिकाणी भरवले त्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकावं असं आवाहन त्यांनी केले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !