भारतीय सशस्त्र सेनेचा अभिमान बाळगावा : कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत
डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये आर्मी डे साजरा
Indian Armed Forces should be proud : Captain Dr.Rajendra Rajput फैजपूर : अवघ्या विश्वातील शक्तिशाली, अनुभवी व सक्षम सैन्य भारताचे असून भारतीय सेनेने आतापर्यंत देशांतर्गत व विदेशातही विविध लढाया व कारवायांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करून नावलौकिक प्राप्त केला आहे. या महानतम सैन्याविषयी समाजातील प्रत्येक घटकाने अभिमान बाळगावा, सन्मान करावा व आपण ज्याही क्षेत्रात आहोत तिथे सर्वोत्तम कामगिरी करून देशाचा मान वाढवावा. असे आवाहन धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर येथील एनसीसी अधिकारी तथा सहयोगी प्रा.कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी केले. डॉ.उल्हास पाटील मेडिकल कॉलेज येथील एमबीबीएस प्रथम व द्वितीय वर्षाच्या नवोदित डॉक्टरांसमोर आर्मी डे च्या अनुषंगाने बोलत होते.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी संचालक डॉ.नारायण आर्वीकर, अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, डॉ.प्रशांत गुडेटी यासोबत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व वैद्यकीय शिक्षण घेणारे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी अत्यंत ओघवत्या शैलीत आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही सशस्त्र सेनेबद्दल कॅप्टन डॉ.राजेंद्र राजपूत यांनी सविस्तर माहिती दिली. यशस्वीतेसाठी अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यांनी परीश्रम घेतले.







