धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धांना सुरूवात
Annual sports festival competition started in Dhanaji Nana college फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव स्पर्धेला जोशात सुरूवात झाली. महाविद्यालयात क्रिकेट, बुध्दिबळ, टेबल टेनिस, बॅडमिंटन, धनुर्विद्या, भारतलोन, शक्तितोलन आणि मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे चेअरमन लिलाधर चौधरी हे उद्घाटक तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे अध्यक्षस्थानी होते.
यांची प्रमुख उपस्थिती
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र.अधिष्ठाता प्रा.डॉ.जगदीश पाटील, अधिसभा सदस्य प्रा.डॉ.पद्माकर पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.विलास बोरोले, उपप्राचार्य प्रा.डॉ.शंकर जाधव, जीमखाना समिती चेअरमन प्रा.डॉ.उदय जगताप, स्नेहसंमेलन चेअरमन प्रा.डॉ.राजश्री नेमाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा.उत्पल चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन महाविद्यालयाचे शारीरीक शिक्षण संचालक प्रा.गोविंद मारतळे यांनी तर आभार प्रा.शिवाजी मगर यांनी मानले. संस्थेचे चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी शारीरीक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी मैदानावर आलेच पाहिजे, असे सांगितले. प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांनी खेळाकडे करीअरच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजे, असे सांगितले.


पहिल्या सामन्यात शिक्षकेतर कर्मचारी संघ विजयी
क्रिकेटसाठी आठ संघानी सहभाग घेतला. पहिला सामना शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यात झाला. या सामन्यात शिक्षकेतर कर्मचारीवर्ग या संघाने 14 धावांनी विजय मिळविला. दुसरा सामना कला शाखा विरूद्ध पदवीधर संघ यांच्यात झाला. या सामन्यात पदवीधर संघाने 46 धावांनी विजय संपादन केला. तिसरा सामना वाणिज्य शाखाविरूद्ध विज्ञान शाखा यांच्यात झाला. यात विज्ञान शाखा संघाने 33 रनने विजय प्राप्त केला.





