हजारो कार्यकर्त्यांसह मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना : मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Manoj Jarange Patil leaves for Mumbai along with thousands of workers: Chief Minister called a meeting आंतरवाली सराटी : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा ठाम निर्धार करीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील शनिवारी हजारो कार्यकर्त्यांसह आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अद्याप जरांगेच्या आंदोलनाला परवानगी मिळाली नसलीतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अनुषंगाने तातडीची बैठक बोलावली आहे.
गोळ्या घातल्या तरी आता माघार नाहीच !
मनोज जरांगे म्हणाले की, मी असेन किंवा नसेन, पण मराठ्यांमध्ये फूट पडून द्यायची नाही. छातीवर गोळ्या जरी घातल्या, तरी मागे हटणार नाही. मराठ्यांची मुले संपवण्याचा घाट घातला जात आहे. मराठ्यांची मुले आत्महत्या करत आहेत. तरीही, सरकार गांभीर्याने घेत नाही. उपोषणामुळे शरीर साथ देत नाही. पण, लढाई टोकाची आहे. आता आरक्षण घेऊन मुलांच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आहे.


असे आंदोलनाचा प्रवास
20 जानेवारी पहिला मुक्काम- बीड तालुक्यातील शिरूर मातोरी डोंगर पट्ट्यात. (बीड)
21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी (नगर)
22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव (पुणे जिल्हा)
23 जानेवारी चौथा मुक्काम- खराडी बाय पास, (पुणे)
24 जानेवारी पाचवा मुक्काम- (लोणावळा)
25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, (नवी मुंबई)
26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी





