भुसावळातील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक पारीतोषीक वितरण
Annual prize distribution at Biyani Public School, Bhusawal भुसावळ : बियाणी इंग्रजी व मराठी माध्यम स्कूल तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा पारीतोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. बियाणी स्कूल इंग्रजी व मराठी माध्यम तसेच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा वार्षिक पारीतोषिक वितरण समारंभ 19 रोजी उत्साहात पार पडला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी राष्ट्रीय शिक्षा समितीचे अध्यक्ष मनोज बियाणी होते. राष्ट्रीय शिक्षा समिती सचिव डॉ.संगीता बियाणी, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार अंगद असतकर, राजेश पारीख, प्रवीण भराडिया, गोपाळ ठाकूर, बियाणी मिलीटरी स्कूलचे प्राचार्य डी.एम.पाटील, बियाणी पब्लिक स्कूलचे प्राचार्य रुद्रसेन गंठिया यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वेगवेगळ्या स्पर्धा तसेच मागील शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना पारीतोषिके व शिल्ड, प्रमाणपत्र देण्यात आले. प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होण्याविषयी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेण्याविषयी, संस्कृती जपण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. आभार प्राचार्य रुद्रसेन गंठिया यांनी मानले.







