जामठी ग्रामपंचायत कार्यालयास ठोकले कुलूप

ग्रामसेवकाला विरोध : नवीन ग्रामसेवकाकडे पदभार देण्यावर पदाधिकारी ठाम


Jamthi Gram Panchayat office locked बोदवड : बोदवड तालुक्यातील जामठी येथील ग्रामसेवक सतत गैरहजर राहत असल्याने गावातील विकासकामे खोळंबली तसेच तीन महिन्यात एकही ग्रामसभा झालेली नाही. सरपंच शांताबाई पाटील या आठ महिन्यापासून सरपंचाचा पदभार सांभाळत असताना त्यांना विश्वासात न घेता वरच्यावर कामे होत असल्याने ग्रामसेवक गोविंद राठोड यांच्या बदलीची मागणी करण्यात आल्यानंतर दिलीप इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र त्यांनाही तत्कालीन ग्रामसेवक पदभार देत नसल्याने शनिवारी सरपंचांसह सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप लावले.

ग्रामसेवक राठोड यांना विरोध
ग्रामसेवक राठोड यांची पिंपळगाव बु.॥, ता.भुसावळ येथून मुक्तळ, ता.बोदवड हे त्यांना मुख्य कार्यालयीन गाव देण्यात आले व त्यानंतर जामठी हे अतिरिक्त गाव देण्यात आले होते. परंतु जामठी येथील कामकाजाच्या सतत तक्रारी येत असल्यानंतर सरपंच शांताबाई पाटील यांच्या तक्रारीनुसार राठत्तेड यांची बदली करण्यात आली व ग्रामसेवक दिलीप सोपान इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र जामठी ग्रामपंचायतीचे दप्तर राठोड हे देत नव्हते. शुक्रवारी सरपंच व सदस्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात नवीन ग्रामसेवक यांना पदभार देण्यासाठी हजेरी दिल्यानंतर सरपंच व विरोधी सदस्यांमध्ये वाद झाले त्यामुळे शनिवारी सकाळी 11 वाजता सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले तर तत्कालीन ग्रामसेवक राठोड यांना ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश देण्यात मज्जाव करीत नवीन ग्रामसेवकाकडे पदभार देण्याची मागणी केली व पदभार जो पर्यंत नवीन ग्रामसेवकाला देण्यात येत नाही तो पर्यंत कुलूप न उघडण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !