भाजपा रुग्ण सेवा आरोग्य सेल भुसावळ शहराध्यक्षपदी मयूर अंजाळेकर


Mayur Anjalekar as BJP Health Cell Bhusawal City President भुसावळ : भुसावळातील सामाजिक कार्यकर्ते तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर राजेंद्र अंजाळेकर यांची भाजपा रुग्ण सेवा आरोग्य सेल भुसावळ शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. भाजपाचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी एका पत्रकान्वये ही निवड केली आहे.

आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य
मयूर अंजाळेकर हे सध्या सहा वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 17 पेक्षा जास्त बाळांच्या हृदयाच्या आणि कानाच्या शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत शिवाय चार कॅन्सर रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून दिल्या आहेत तसेच पाच बायपास व तीन कर्करोगाच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. कोरोनासारख्या महामारीत त्यांनी गरजू लोकांना तसेच तृतीयपंथीयांना मोफत धान्य वाटप केले आहे.



निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
मयूर अंजाळेकर यांच्या निवडीनंतर मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भुसावळ विधानसभा निवडणूक प्रमुख संजय पाटील आदींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !