भुसावळ शहरात भाजपतर्फे कारसेवकांचा सन्मान
Car servants honored by BJP in Bhusawal city भुसावळ : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या भुसावळ शहरातील कारसेवकांचा सन्मान रविवार, 21 जानेवारी रोजी शहरातील लोणारी समाज मंगल कार्यालयात करण्यात आला. भारतीय जनता पार्टी भुसावळ शहरातर्फे आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यास कारसेवकांचा सत्कार जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे, माजी पालकमंत्री व आमदार संजय सावकारे, शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक यांची उपस्थिती होती. यावेळी आमदार सावकारे म्हणाले, अयोध्येत राम मंदिरात होण्यासाठी अनेक कार सेवकांना कारागृहात जावे लागले व कार सेवकांमुळे आज मंदिराला मूर्त रूप आले आहे.
28 कार सेवकांचा सन्मान
श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवकांचा झालेल्या सत्कारात तब्बल 28 कारसेवकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. दिवंगत झालेल्या आठ कारसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांनी सत्कार स्वीकारला. याप्रसंगी उपस्थित कारसेवकांपैकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक दिलीप ओक, त्यावेळी सर्वात कमी वयाच्या महिला कारसेविका असलेल्या नंदा फडणीस, महेंद्र मांडे व संतोष मराठे यांनी मनोगत व्यक्त करत श्रीराम जन्मभूमी आंदोलनातील कारसेवेच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे शहर सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, उपाध्यक्ष पवन बुंदेले, चेतन बोरोले, शेखर इंगळे, पवन सरोदे, प्रसन्न पांडे आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन तुषार चिंदळे यांनी केले.







